... तर युवराज आणि रैनासाठी टीम इंडियाची दारं खुली : रवी शास्त्री
फिटनेस आणि कामगिरी चांगली असेल तर कोणताही खेळाडू राष्ट्रीय संघात खेळू शकतो. यामध्ये क्षेत्ररक्षण सर्वात महत्त्वाचं आहे, असंही रवी शास्त्री म्हणाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान रैना आणि युवराज आता केवळ फिटनेसच्या बळावरच टीम इंडियात पुनरागमन करु शकतात, हे रवी शास्त्री यांच्या वक्तव्यानंतर स्पष्ट झालं आहे.
युवराज सिंह देखील फिटनेस आणि खराब कामगिरीमुळे संघातून बाहेर आहे. फिटनेस टेस्टमध्ये अपात्र ठरल्यामुळे रैना आणि युवराज संघातून बाहेर असल्याची माहिती आहे.
श्रीलंकेला क्लीन स्विप दिल्यानंतर टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. भारतात होणाऱ्या या मालिकेत 5 वन डे आणि 3 टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत.
यादरम्यानच एका वृत्त वाहिनीशी बोलताना टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी युवराज सिंह आणि सुरेश रैना यांच्याबाबतीत मोठं वक्तव्य केलं आहे.
युवराज सिंह आणि सुरेश रैना यांच्या टीम इंडियातील पुनरागमनाबाबत रवी शास्त्री यांना प्रश्न विचारण्यात आला. ते दोघे फिट असतील तर त्यांना संघात घेतलं जाईल, असं उत्तर रवी शास्त्री यांनी दिलं.
सुरेश रैना जवळपास दोन वर्षांपासून म्हणजे ऑक्टोबर 2015 पासून वन डे संघातून बाहेर आहे. यावर्षात त्याने एकमेव टी-20 सामना खेळला होता.
रवी शास्त्री यांनी धोनीच्या फिटनेसचंही कौतुक केलं आणि तो 2019 विश्वचषकासाठी पहिली पसंत असल्याचं सांगितलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -