पाहा या फलंदाजांची बॅटवरच्या स्टिकरमधून किती कोटींची कमाई
कर्णधार धोनीला मागे टाकत टीम इंडियाचा कसोटीचा कर्णधार आणि तुफानी फलंदाज विराट कोहली एमआरएफच्या (MRF) स्टिकरसाठी आठ कोटी घेतो.
टीम इंडियाचा वनडे आणि टी20चा कर्णधार महेंद्रसिंह धोनी स्पार्टनच्या (Spartan) स्टिकरसाठी सहा कोटी घेतो.
सिक्सर किंग युवराज सिंह आपल्या बॅटवरील पुमाच्या (PUMA) स्टिकरसाठी चार कोटी घेतो.
दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलिअर्स आपल्या बॅटवरील कुकाबुराच्या (Kookaburra) स्टिकरसाठी साडेतीन कोटी घेतो.
टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज रोहित शर्मा आपल्या बॅटवरील सीएटच्या (CEAT) स्टिकरसाठी तीन कोटी घेतो.
टीम इंडियाचा फलंदाज शिखर धवन आपल्या बॅटवरील एमआरएफच्या (MRF) स्टिकरसाठी तीन कोटी घेतो.
टीम इंडियाचा फलंदाज सुरेश रैना आपल्या बॅटवरील सीएटच्या (CEAT) स्टिकरसाठी अडीच ते तीन कोटी घेतो.
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल आपल्या बॅटवरील स्पार्टनच्या (Spartan) स्टिकरसाठी तब्बल तीन कोटी घेतो.
जाहिरातींमधून क्रिकेटर्स बक्कळ पैसा कमावतात हे सर्वश्रुतच आहे. पण ते ज्या बॅटनं खेळतात त्या बॅटवरील स्टिकरनं ते कोट्यवधींच्या कमाई करतात. पाहा बॅटवरील स्टिकरनं किती कमाई करतात हे खेळाडू