गोव्यात नरकासूर दहनाने दीपावलीची धूम सुरू
गोव्यात गणेशोत्सवाप्रमाणे दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोव्यात दीपावलीमध्ये नरकासूर दहन हा महत्वाचा घटक आहे. देशात दसऱ्याला रावणाचे दहन केले जाते गोव्यात मात्र नरक चतुर्दशी दिवशी नरकासुराचे दहन करून दीपावली साजरी केली जाते.
नरकासूर दहनाने गोव्यात दीपावलीची धूम सुरु झाली आहे.
एक फूटापासून 80 फूटांपर्यंत मोठे नरकासूर काल पहायला मिळाले.
कालपासून गोव्यात सर्वत्र भले मोठे नरकासूर बनवून ते लोकांना पहाण्यासाठी ठेवण्यात आले होते.
बलात्कार प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या बाबा राम रहीम देखील नरकासुर स्वरुपात पहायला मिळाला.
रात्री उशिरा हजारो नरकासुरांनी या स्पर्धामध्ये भाग घेतला. नरकासूर पाहण्यासाठी गर्दी व्हावी यासाठी डीजे आणि आकर्षक प्रकाश योजनेचा वापर करण्यात आला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -