मोठ्या पडद्यावरुन गायब असलेल्या उदय चोप्राला ओळखणंही मुश्किल!
उदय त्याच्या सिनेमांपेक्षा रिलेशनशिपमुळे जास्त चर्चेत राहिला. अभिनेत्री नर्गिस फाखरीसोबत तिचं नाव जोडलं होतं. दोघेही गोव्यात सीक्रेट व्हेकेशन करताना दिसले होते. मात्र नंतर दोघांचं ब्रेकअप झाल्याचं वृत्त आलं.
2013 मध्ये आलेल्या 'धूम-3' नंतर उदय चोप्रा कोणत्याही सिनेमात दिसला नाही.
'मोहब्बतें' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेता उदय चोप्राला फारसं यश मिळालं नाही, पण तो चर्चेत मात्र राहिला. मात्र नुकतेच त्याचे काही फोटो समोर आले जे पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का जरुर बसेल.
उदय चोप्राने 2012 मध्ये 'योमिक' कंपनीची स्थापना केली. तो यशराज फिल्म्सचा मॅनेजरही आहे. 2014 मधील 'ग्रेस ऑफ मोनॅको' आणि 'द लॉन्गेस्ट वीक' या चित्रपटांची निर्मितीही केली आहे. या सिनेमातून यशराज एन्टरटेन्मेंटने हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं.
उदय चोप्राने 1991 मध्ये आलेल्या 'लम्हे' सिनेमातून असिस्टंट डायरेक्टर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. यानंतर 2000 मध्ये 'मोहब्बतें' सिनेमातून त्याने अभिनयात पदार्पण केलं. त्याने 'मेरे यार की शादी है' (2002), 'धूम' (2004), 'नील अँड निक्की' (2005), 'धूम 2' (2006), 'धूम 3' (2013) या सिनेमात काम केलं आहे.
सोशल मीडियावर त्याच्या नवीन लूकची थट्टा होत आहे. दंगल 2 मध्ये उदय चोप्रा आमीर खानला रिप्लेस करणार असल्याचं ट्वीट काहींनी केलं आहे. तर मोदींच्या बायोपिकसाठी उदय चोप्रा योग्य चॉईस असल्याचं काहींनी म्हटलं आहे.
इतकंच नाही तर दाढीही पांढरी झाली आहे. काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्समध्ये असलेल्या उदयने टोपी घातली होती. त्यामुळे एक क्षण हाच उदय चोप्रा आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
इम्रान हाश्मीच्या वांद्र्यातील घराबाहेर असताना उदय चोप्रा कॅमेऱ्यात कैद झाला. बऱ्याच काळाने कॅमेऱ्यासमोर आलेल्या उदय चोप्राचा लूक फारच बदलला आहे, शिवाय त्याचं वजनही वाढलं आहे.