धोनीचा श्रीलंकेच्या खेळाडूंना 'गुरुमंत्र'
श्रीलंकेने दिलेलं 136 धावांचं आव्हान भारतीय फलंदाजांनी शेवटच्या षटकात चार चेंडू राखून पूर्ण केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या टी-20 सामन्यात धोनीने विजयी चौकार ठोकला.
यावेळी धोनी श्रीलंकेचा फिरकीपटू अकिला धनंजया आणि उपुल थरंगा यांच्याशी बातचीत करत होता.
संपूर्ण मालिकेत श्रीलंकेला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रमावेळी श्रीलंकेचे युवा खेळाडू धोनीकडून टिप्स घेत होते.
या सामन्यानंतर टीम इंडिया बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात व्यस्त होती, तर धोनी श्रीलंकेच्या खेळाडूंना गुरुमंत्र देत होता.
धोनी धनंजयाला क्रिकेटमधील बारकावे शिकवत होता, हे त्याचे हावभाव पाहून स्पष्ट दिसत होतं.
भारताकडून मनीष पांडेने चौकारांसह 32 धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने 30 आणि कर्णधार रोहित शर्माने 27 धावांचं योगदान दिलं.
टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्च्या तिसऱ्या ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात पाच विकेट्सने विजय मिळवला. या विजयासाह भारताने ही मालिका 3-0 अशी जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -