धोनीची बाईकसवारी आणि टीममेटसोबत पार्टी
एबीपी माझा वेब टीम | 15 Jun 2016 10:25 AM (IST)
1
टीम इंडिया आज झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
2
हरारे वन डे मध्ये सलग दुसऱ्या विजयानंतर धोनी हरारेच्या रस्त्यांवर आपली बाईकसवारी करताना दिसला.
3
धोनीने झिम्बाम्बे पोलिसांच्या बाईकवर बाईकसवारी केली. धोनीने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
4
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी बाईकप्रेमी असल्याचं सर्वांनाच माहित आहे. संधी मिळेल तेव्हा धोनी बाईकसवारी करत असतो. झिम्बाब्वेतील हरारे वन डे नंतरही असाच अनुभव आला.
5
धोनीने यापूर्वी टीममेट्ससोबत जमिनीवर बसून केलेल्या पार्टीचा फोटो शेअर केला होता.