धोनीच्या हस्ते ‘धोनीः दी अनटोल्ड स्टोरी’चा ट्रेलर रिलीज

या सिनेमाची निर्मीती फॉक्स स्टार स्टुडिओद्वारा केली आहे. तर दिग्दर्शन निरड पांडे यांनी केलं आहे. सुशांत सिंह राजपूतने धोनीची भूमिका निभावण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. बॉलिवूडच्या कलाकारांची भली मोठी फौज या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा येत्या 30 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ट्रेलर लाँचिंगसाठी धोनी दिल्ली, मुंबई आणि जालंधर या तीन शहरांचा दौरा करणार आहे. या सिनेमात धोनीच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत दिसणार आहे.

धोनीने हजारो चाहत्यांसमवेत ट्रेलर लाँच केला. ट्रेलर पाहून जीवनातील जुन्या आठवणी जाग्या झाल्याची भावना कॅप्टन कूलने यावेळी बोलताना व्यक्त केली. धोनीच्या जीवन प्रवासावर हा सिनेमा आधारित आहे.
चाहत्यांचा जल्लोष पाहून धोनही चांगलाच भारावला. चाहत्यांनी धोनीला हेलिकॉप्टर शॉट खेळून दाखवण्याची मागणी केली. चाहत्यांची ही मागणी कॅप्टन कूलने लगेच पूर्ण केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -