टीम इंडियानं मालिका तर जिंकली, पण धोनीला गमावलं असतं!
धोनी टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. तर विकेटकिपर म्हणूनही त्याचं प्रदर्शन सर्वोत्कृष्ट आहे. विकेटकिपिंग करताना त्याने आजवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 705 बळी मिळवले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाचा अर्थ धोनीच्या डोळ्याला जास्त इजा झाली असती तर टीम इंडियाला फारच मोठं नुकसान झालं असतं. याआधी सबा करीम या विकेटकिपरच्या डोळ्याला इजा झाली होती. ज्यामुळे त्याला क्रिकेट सोडावं लागलं होतं.
आज कर्णधार धोनीनं एक फोटो अपलोड केला. ज्यामध्ये धोनीचा एक डोळा पूर्णपणे लाल झालेला पाहायला मिळाला. या फोटोसोबत धोनीनं लिहलं की, 'तुमच्या डोळ्याला बेल्स लागल्यानंतर असं होतं. नशीबानं मला फार दुखापतीमध्ये विकेटकिपिंग करावं लागलं नाही.'
मॅच दरम्यान, एक चेंडू स्टंपवर जाऊन आदळला आणि स्टंपवरील बेल्स उडून थेट धोनीच्या डोळ्याला जाऊन लागली. यामुळे धोनीच्या डोळाला थोडी इजाही झाली.
पण या सामन्यात टीम इंडिया मोठा फटका बसण्याची शक्यता होती. ज्यामधून टीम इंडिया थोडक्यात बचावली.
8 डिसेंबर 2011 रोजी भारताच्या वेस्ट इंडिजविरुद्ध 418 धावा
काल झिम्बाब्वेविरुद्ध खेळलेल्या तिसऱ्या आणि अंतिम टीम२० सामन्यात टीम इंडियाने रोमांचक विजय मिळवून 2-1 ने मालिका आपल्या नावावर केली
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -