'धडक' सिनेमासाठी जान्हवीला किती रुपये मिळाले?
श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सिनेमात तिच्यासोबत ईशान खट्टर आणि आशुतोष राणा आहे. 'धडक' हा सुपरहिट मराठी चित्रपट 'सैराट'चा अधिकृत रिमेक आहे.
याशिवाय सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या आशुतोष राणा यांची फी 50 लाख रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.
चित्रपटाचा दिग्दर्शक शशांक खेतानला 4 कोटी रुपये मिळाले आहेत.
सिनेमाचं बजेट 25 ते 30 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार, जान्हवी कपूरला सर्वात कमी मानधन मिळालं आहे. तिला या चित्रपटासाठी 40 ते 45 लाख रुपये मिळाल्याचं कळतं.
तर ईशान खट्टरचा हा दुसरा चित्रपट आहे. याआधी तो 'बियॉन्ड द क्लाउड्स'मध्ये दिसला होता. चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या ईशानला 60 ते 70 लाख रुपये फी मिळाल्याची माहिती आहे.
जान्हवी-ईशानचा 'धडक' हा चित्रपट 20 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
'सैराट'चा दिग्दर्शक नागराज मंजुळे आहे. रिमेक राईट्ससाठी त्याला 2 कोटी रुपये दिल्याचं वृत्त बॉलिवूड लाईफ या वेबसाईटने दिलं आहे.
तर म्युझिक कम्पोझर अजय-अतुलला दीड कोटी मिळाल्याचं वृत्त आहे.