महाशिवरात्रीनिमित्त देशभरात उत्साह, शिवमंदिरात भाविकांची गर्दी
नाशिक : त्रयंबकेश्वर मंदिर
नाशिक : त्रयंबकेश्वर मंदिर
नाशिक : त्रयंबकेश्वर मंदिर
सिंधुदुर्ग : कुणकेश्वर मंदिर
सिंधुदुर्गातील कुणकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते. कुणकेश्वर गावाच्या समुद्र किनारी वसलेल्या या मंदिराला शिवकालीन इतिहास आहे. स्वता शिवाजी महाराजच या मंदिरात येऊन गेल्याचं सांगितलं जातं. या मंदिरात 107 शिवलिंगं आहेत. महाशिवरात्रीनिमित्त इथं कोकणातीलच नाही तर राज्यातूनही भक्त येतात.
भीमाशंकर मंदिर
भीमाशंकर मंदिर
आज महाशिवरात्रीनिमित्त12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरच्या मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केलीय. पुण्याचे जिल्हाधिकारी आणि दीलिप वळसे पाटील यांच्या हस्ते काल रात्री 12च्या ठोक्यालाच आरती करण्यात आली. त्यानंतर हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली आहे.
बाबुलनाथ मंदिर
बाबुलनाथ मंदिर
महाशिवरात्रीनिमित्त राज्यभरातल्या शिवमंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केलीय. मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिरात शिवभक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. मंदिरात शिवभक्तांनी बेल, फुले वाहून दुग्धाभिषेकही केला. भाविकांकडून हर हर महादेवचा गजर करण्यात आला.
औरंगाबाद : घृष्णेश्वर मंदिर
औरंगाबादेत महाशिवरात्रीनिमित्त घृष्णेश्वर मंदिरात भक्तांची अलोट गर्दी. तर भाविकांचा हर हर महादेवचा जयघोष.
अंबरनाथ : शिवमंदिर
अंबरनाथ : शिवमंदिर
महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. रात्री 12 वाजतापासून मंदिरात दर्शन सुरु झालं. अंबरनाथ शहराची ओळख असलेलं हे शिवमंदिर तब्बल 958 वर्ष जुनं असून शिलाहार राजांनी हे मंदिर उभारलं होतं. दरवर्षी महाशिवरात्रीला या मंदिरात भाविकांचा महासागर दर्शनासाठी लोटतो.