वॉर्नरने आयपीएलमध्ये ख्रिस गेल, विराटसह दिग्गजांना मागे सोडलं
आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक अर्धशतकं असणाऱ्या खेळाडुंच्या यादीतही वॉर्नर दुसऱ्या स्थानावर आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाशिवाय वॉर्नरने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतक ठोकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर केला. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर एकूण 35 अर्धशतकं आहेत.
वॉर्नरने टी-20 क्रिकेटमध्ये 7 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये सात हजार धावा पूर्ण करणारा तो जगातला चौथा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी ख्रिस गेल, ब्रँडम मॅक्युलम, ब्रॅड हॉज यांनी 7 हजार धावांचा पल्ला गाठला आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक 78 अर्धशतकं आहेत.
गुजरातने हैदराबादला केवळ 136 धावांचं आव्हान दिलं होतं. डेव्हिड वॉर्नरने 6 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 45 चेंडूक 76 धावा ठोकल्या. तर त्याचा साधीदार हेनरिक्सने 52 धावांची अर्धशतकी खेळी करत विजयात महत्वाची भूमिका निभावली.
वॉर्नरने या विजयासोबतच एका विक्रमालाही गवसणी घातली.
गुजरात लायन्सला त्यांच्या आयपीएलमधील दुसऱ्या सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मोईसेस हेनरिक्स यांच्या अभेद्य भागीदारीच्या बळावर हैदराबादने हा सामना 9 विकेट्सने जिंकला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -