खातेवाटप जाहीर, कोणाला मिळालं प्रमोशन?
पंकजा मुंडेंसोबतच मुख्यमंत्र्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंनाही धक्का दिला आहे. विनोद तावडेंकडे असणारं वैद्यकीय शिक्षण खातं काढून ते गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं आहे.
कॅबिनेटपदी प्रमोशन झालेल्या राम शिंदे यांच्याकडे जलसंधारण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर जयकुमार रावल यांच्याकडे रोजगार हमी योजनेची जबाबदारी देण्यात आली आहे.
पंकजा मुंडेकडील जलसंधारण आणि रोजगार हमी योजना ही दोन महत्वाची खाती काढून घेण्यात आली आहेत. सध्या त्यांच्याकडे ग्रामविकास आणि महिला बालकल्याण या खात्यांची जबाबदारी आहे.
खाते वाटपात मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना जोरदार धक्का दिला आहे. या दोघांकडील महत्त्वाची खाती मुख्यमंत्र्यांनी काढून घेतले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी आज खाते वाटप जाहीर केले असून या खाते वाटपात पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्याकडील काही महत्वाची खाती काढून घेण्यात आली आहेत. तर दुसरीकडे काही मंत्र्यांची महत्वाच्या खात्यात वर्णी लागली आहे. पाहा कोणत्या मंत्र्याला मिळालं कोणतं खातं.