महाराष्ट्रासह राजधानी दिल्लीतही गणेशोत्सवाची धूम
महाराष्ट्रात गणपती आणि कोकणी माणूस यांचं अतूट नातं आहे हे आपणाला मुंबई आणि महाराष्ट्रात नेहमी जाणवतं. त्याचीच साक्ष देणारा एक गणपती राजधानीच्या राजेंद्रनगर परिसरात वसतो. कोकण, मंगलोर, उडीपी या भागातून लोक तब्बल 42 वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र सदनातही गणेशोत्सावाची धूम पाहायला मिळत आहे. जुन्या महाराष्ट्र सदनात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपतीची धूमधडाक्यात स्थापना करण्यात आली आहे. नोकरीसाठी अनेक मराठी बांधव दिल्लीत राहतात. त्यांनी सुरु केलेली गणेशोत्सवाची परंपरा अनेक वर्षांपासून टिकून आहे.
दुसरीकडे नेहमीच वेगवेगळ्या विद्यार्थी आंदोलनामुळं चर्चेत असणाऱ्या जेएनयूमध्येही गणेशोत्सावाची धूम पाहायला मिळालं आहे. डाव्या विचारांच्या या बालेकिल्यात गेल्या वर्षीपासून ही परंपरा सुरु झाली आहे. यंदा या गणपतीला प्रतिसाद वाढत आहे.
दिल्ली हाटमध्ये सध्या गणेशोत्सवाचा फीव्हर पाहायला मिळत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा गणपती या ठिकाणी दिमाखात विराजमान झाला आहे. यंदा दिल्ली पर्यावरण खात्यानं या गणपतीसाठी विशेष साहाय्य केलं आहे. ज्येष्ठ मूर्तीकार राम सुतार यांनी साकारलेली गणेशमूर्तीची या मंडळानं प्रतिष्ठापना केली आहे.
राजधानीत छोटीमोठी अशी एकूण तब्बल 40 गणेश मंडळं आहेत. करोलबाग, गुडगाव इथल्या मराठी समुहाशिवाय, आता काही अमराठी मंडळंही वाढू लागली आहेत. महाराष्ट्रापासून लांब असले तरी मराठी बांधव आपली संस्कृती मात्र टिकवून आहेत हेच यातून दिसतं.
राज्यात सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धूम सुरु आहे. पण दुसरीकडे राजधानी दिल्लीतही याची झलक पाहायला मिळत आहे. दिल्लीतील जवळपास 40 लहान-मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -