संरक्षणमंत्र्यांची 'सुखोई'तून भरारी
संरक्षण मंत्रिपद स्वीकारल्यापासून निर्मला सीतारमण या जवानांना प्रोत्साहन देण्याचं काम करत आहेत. त्यांनी भारत-पाकिस्तान सीमा, भारत-चीन सीमेवर हजेरी लावली होती. त्यांनी अरुणाचल सीमेवर हजेरी लावली होती, त्यावेळी चीन सैनिकांनीही त्यांना अभिवादन केलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुखोई-30 एमएकेआय या विमानाला एयफोर्समध्ये मानाचं स्थान आहे. भारताकडे 2020 पर्यंत तब्बल अशी 270 विमानं असतील. मिग-21 आणि मिग 27 यांच्या जागी ही लढाऊ विमानं घेतील.
31 स्वार्डन लॉयन यांच्याकडे संरक्षण मंत्र्यांच्या उड्डाणाची जबाबदारी होती. नुकतंच निर्मला सीतारमण यांनी आयएनएस विक्रमादित्यवर मिग-29 या विमानातून उड्डाण केलं होतं.
सुखोईतून उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री ठरल्या आहेत. यापूर्वी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही सुखोईतून भरारी घेतली होती.
देशाच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सुखोई विमानातून भरारी घेतली. हवाई दलाच्या जोधपूर विमानतळाहून त्यांनी सुखोई-30 एमएके या विमानातून उड्डाण केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -