मादाम तुसाँमध्ये दीपिका पदुकोणचा मेणाचा पुतळा
एबीपी माझा वेब टीम | 23 Jul 2018 08:01 PM (IST)
1
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची लंडनच्या मादाम तुसाँ संग्रहालयात वर्णी लागणार आहे.
2
भारतासह जगभरातील अनेक प्रभावशाली व्यक्तिमत्वांचे पुतळे मादाम तुसाँमध्ये बनवण्यात आले असून आता दीपिकाचाही त्यामध्ये समावेश होणार आहे.
3
खुद्द दीपिकानेच फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून ही गोष्ट आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली.
4
2019 पर्यंत दीपिकाचा मेणाचा पुतळा लंडनमधील संग्रहालयात चाहत्यांना पाहता येणार आहे.
5
मादाम तुसाँमधील कलाकारांनी दीपिकाची लंडनमध्ये पुतळ्यासंदर्भात भेट घेतली. त्यावेळी पुतळा बनवण्यासाठी तिचे माप देखील घेण्यात आले.
6
दीपिकाने ओम शांती ओम या चित्रपटातून बॉलिवूडमधील तिच्या कारकिर्दिला सुरुवात केली होती.
7