माझा साखरपुडाही झालेला नाही आणि मी प्रेग्नंटही नाही: दीपिका पदुकोण
(Photos: Solaris)
दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोण
दीपिका आणि फवाद खानच्या या लूकची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.
मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये दीपिकानं शो स्टॉपर म्हणून रॅम्प वॉक केला.
दीपिका म्हणाली की, मला असं वाटतं की, काही गोष्टी आताच स्पष्ट करणं योग्य होईल. मी गर्भवती देखील नाही, माझा साखरपुडाही झालेला नाही आणि माझं लग्न देखील झालेलं नाही. तसचं सध्यातरी माझा लग्नाचा विचारही नाही.
या कार्यक्रमावेळी दीपिका म्हणाली की, या अफवांना उत्तर देण्यासाठी हिच योग्य वेळ आहे.
अशा अफवा आहेत की, दीपिकानं बॉयफ्रेंड आणि अभिनेता रणवीर सिंह यांचा साखरपुडा झाला असून लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत.
याचवेळी बोलताना दीपिकानं लग्नाच्या वृत्ताचं खंडन केलं.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण काल दिल्लीतील मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये अभिनेता फवाद खानसोबत रॅम्पवर दिसली. दिपीका यावेळी नवरीच्या लूकमध्ये दिसून आली.