दीपिका-रणवीरच्या लग्नाचं तिसरं रिसेप्शन
रणवीर-दीपिकाचं मोस्ट अवेटेड लग्न इटलीच्या लेक कोमोच्या किनाऱ्यावरील विला देल बलबियानेलो इथे 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी झालं होतं.
दीपिका पादूकोणने हातात लाल चुडा घातला होता.
त्यानंतर रणबीरच्या कुटुंबियांसाठी मुंबईत रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं.
याआधी बंगळुरुमध्ये 21 नोव्हेंबर रोजी दीपिकाच्या कुटुंब आणि जवळच्या लोकांसाठी रिसेप्शनचं आयोजन केलं होतं.
तर रणवीर सिंहने या खास सोहळ्याला रोहित बालने डिझाईन केलेला ड्रेस घातला होता.
या रिसेप्शनला दीपिका पादूकोणने अबू जानी खोसलाने डिझाईन केलेली गोल्ड चिकनकारी साडी परिधान केली होती. यावर तिने मल्टिलेअर्स फ्लोरल नेकलेस घालून तिचा लूक पूर्ण केला.
दोघांनी फोटोग्राफर्ससाठी पोझही दिल्या.
या निमित्ताने हे नवदाम्पत्य एकमेकांचा हात हातात घालून पोहोचले.
अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा 28 नोव्हेंबरला मुंबईच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये पार पडला.