जगातील सर्वात सुंदर आणि तेवढेच धोकादायक रेल्वेमार्ग

रेल्वे प्रवासाबद्दल आपण सारेच उत्सुक असतो. भारतात वेगवेगळ्या प्रकारचे रेल्वेमार्ग पर्यटकांना आकर्षित करत असतात. पण आज जगातील सर्वात धोकादायक रेल्वेमार्गांबद्दल जाणून घेऊ.
ऑस्ट्रेलियातील कुरँडा सीनिक रेल्वेमार्ग जगातील धोकादायक रेल्वेमार्गांपैकी एक आहे. हा रेल्वेमार्ग दरी आणि धबधब्यांमधून जातो.
अमेरिकेतील जॉर्जटाऊन लूप रेल्वे रोड हा जगातील सर्वात धोकादायक रेल्वेमार्गांपैकी एक आहे. हा रेल्वेमार्ग 640 फूट उंचीवर आहे.
भारतातील सर्वात सुंदर आणि तेवढाच धोकादायक रेल्वेमार्ग चेन्नई ते रामेश्वरम दरम्यान आहे. 1914 साली इंग्रजांनी हा रेल्वेमार्ग बनवला होता.
रेल्वे प्रवासाबद्दल आपण सारेच उत्सुक असतो. भारतात वेगवेगळ्या प्रकारचे रेल्वेमार्ग पर्यटकांना आकर्षित करत असतात. पण आज जगातील सर्वात धोकादायक रेल्वेमार्गांबद्दल जाणून घेऊ.
अर्जेंटीनातील ट्रेन ए लास नुबेस रेल्वेमार्ग अँडीज पर्वतरांगामधून जातो. हा रेल्वेमार्ग बनवण्यासाठी 27 वर्षांचा कालावधी लागला होता.