अंबेनळी घाटाच्या 800 फूट दरीत कोसळलेली बस बाहेर काढण्यात यश
ही बस बाहेर काढल्यानंतर आता पुढील तपासाला दिशा मिळण्याची शक्यता आहे. या बसची तपासणी केल्यावर कदाचित या अपघाताचं तांत्रिक कारण समजण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदापोली कृषी विद्यापीठाची बस 28 जुलै 2018 रोजी आंबेनळी घाटातील 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळली होती. या बसमधील विद्यापीठाचे 30 कर्मचारी जागीच मृत पावले होते. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही.
या कामासाठी महाबळेश्वर ते पोलादपूर मार्ग आज आठ तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रशासनाच्या तब्बल सहा तासांच्या प्रयत्नांनंतर बस दरीतून बाहेर काढण्यात आली.
दोन महिन्यापूर्वी अंबेनळी घाटात कोसळलेली दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीतून बाहेर काढली आहे.
या अपघातात प्रकाश सावंत देसाई हे एकमेव कर्मचारी बचावले. सावंत देसाई यांनी विद्यापीठाच्या चौकशी समितीपुढे दिलेल्या जबाबानुसार बसमधील वाहनचालक दोन वेळा बदली करण्यात आले.
दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांनी सावंत देसाई यांच्यावर जो आरोप केला होता, त्यावर ते आजही ठाम आहेत. सावंत देसाई यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. ही बस बाहेर काढल्यानंतर स्टेअरिंगचे ठसे घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
बस चांगल्या स्थितीत होती. अपघातावेळी प्रशांत भांबिड हे मुख्य वाहन चालक हे बस चालवत होते, असं त्यांचं म्हणणं आहे. पण सावंत देसाई हेच बस चालवत होते, असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -