'दंगल'ची तिसऱ्या दिवशीची कमाई किती?

आमीर खानचे 100 कोटी क्लबमधील सिनेमे : 1. गजनी - 2008, 2. 3 इडियट्स - 2009, 3. धूम 3 - 2013, 4. पीके - 2014, 5. दंगल - 2016
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या सिनेमात महावीर सिंह फोगट यांनी आपल्या मुली गीता आणि बबीता यांना कशाप्रकारे कुस्तीचं प्रशिक्षण देत आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बनवलं.

सिनेमाचं कथानक हरियाणातील पैलवान महावीर सिंह फोगट यांच्या जीवनावर आधारीत आहे. आमीर खाननं महावीर सिंह फोगट यांची भूमिका जीवंत करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
या सिनेमाने भारतातच नव्हे तर वर्ल्डवाईड देखील मोठी कमाई केली आहे. पहिल्या दिवशी शुक्रवारी सिनेमाने वर्ल्डवाईड 28.49 कोटी रुपयांची कमाई केली होती. वर्ल्डवाईड दुसऱ्या दिवशीचा आकडा अजून येणं बाकी आहे.
शुक्रवारी म्हणजे पहिल्या दिवशी सिनेमाने 29.78 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर शनिवारी 34.82 कोटींचा गल्ला जमवला, रविवारच्या कमाईसह सिनेमाने आतापर्यंत 106.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
यासोबत आमीरचा हा 100 कोटींची कमाई करणारा पीकेनंतर पाचवा सिनेमा ठरला आहे.
मुंबई : अभिनेता आमीर खानच्या दंगल सिनेमाने वीकेंडला मोठी कमाई केली आहे. रविवारी सिनेमाने 42.35 कोटी रुपयांची कमाई करत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -