बॉक्स ऑफिसवर दहाव्या दिवशीही आमीरच्या 'दंगल'चा धुमाकूळ
आमीरच्या 'दंगल'ने दुसऱ्या आठवड्यात 72.93 कोटीची कमाई केली आहे. सिनेमा ट्रेड अनॅलिस्ट तरन आदर्श यांनी ट्वीट करुन दंगलच्या कमाईचे आकडे जाहीर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या दहा दिवसात या सिनेमाने एकूण 270.47 कोटीची कमाई केली असून, चालू आठवड्यात 300 कोटीचा टप्पा सहज पार करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
'दंगल'ने प्रदर्शनापासून बॉक्स ऑफिसवर तीनच दिवसात 100 कोटीचा गल्ला गोळा केला होता. कमी दिवसात हा टप्पा पार करणारा आमीराचा हा पाचवा सिनेमा असून 2014 मधील 'पीके', 2013 मधील 'धूम-2', 2009 मधील 'थ्री इडियटस' आणि 2008 मधील 'गजनी'ने हा विक्रम रचला होता.
'दंगल'ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 29.78 कोटी, दुसऱ्या दिवशी 34.82 कोटी, तिसऱ्या दिवशी 42.41 कोटी, चौथ्या दिवशी 25.69 कोटी, पाचव्या दिवशी 23.09 कोटी, सहाव्या दिवशी 21.46 कोटी, सातव्या दिवशी 2.29 कोटी, आठव्या दिवशी 18.59 कोटी, नवव्या दिवशी 23.07 कोटी, आणि दहाव्या दिवशी 31.27 कोटीची कमाई केली.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा 'दंगल' या सिनेमाने प्रदर्शनापासून अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. आमीरच्या दंगलने या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवरील आपल्या कमाईचा वेग कायम राखला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -