...यांनी थेट शिडी लावूनच हंडी फोडली!
आपल्या सरावाचं कसब दाखवण्यासाठी गोविंदा पथकाने ही सलामी दिली आहे.
जोगेश्वरी परिसरात साईराम गोविंदा पथकाने डोळ्यावर काळी पट्टी बांधून चार थरांची सलामी दिली.
दरम्यान आजच्या दिवशी अनेक गोविंदा पथक वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करत आहे.
पोलिस कारवाई टाळण्यासाठी काही पथकांनी 20 फुटांच्या आतच हंडी बांधायचं ठरवलं आहे.
आयोजकांवर पोलिसांनी कारवाई करण्याचेही संकेत दिले आहेत.
काही मंडळं आणि राजकिय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळायला नकार दिला होता.
काही मंडळांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात एल्गार पुकारला असला, तरीही काही मंडळांनी न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांमध्येच सण साजरं करायचं ठरवलं
शिडी लावून हंडी फोडून या पथकानं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा निषेध केला.
या गोविंदा पथकानं थेट शिडी लावून हंडी फोडली.
दादरमध्ये एका गोविंदा मंडळानं आपला निषेध फारच अनोख्या पद्धतीनं साजरी केली.