आयपीएलच्या फायनलमधली व्हायरल होणारी 'ती' तरुणी कोण?

आदितीला 2018 साली मिस राजस्थानचा किताब मिळाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई विरुद्ध चेन्नईच्या अंतिम सामन्यात मिस दिवा सुपरानॅशनल 2018 ची विजेती आदिती हुंदिया प्रेक्षकांमध्ये बसून सामन्याचा आनंद लुटत होती. तेव्हा कॅमेरामनने तिच्या अदा कॅमेरात कैद केल्या आणि एका रात्रीत तीदेखील प्रसिद्धीझोतात आली आहे.

कालच्या फायनल मॅचनंतर आयपीएलचे अनेक चाहते आदितीला गुगल, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर शोधत आहेत.
आदितीने तिच्या कारकिर्दीची सुरुवात फेमिना मिस इंडिया 2018 या स्पर्धेपासून केली होती. त्यानंतर तिने मिस राजस्थान स्पर्धेतदेखील सहभाग घेतला होता.
सोशल मीडियाच्या जगात कधी कोण प्रसिद्ध होईल सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या (आरसीबी) सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये बसलेली आरसीबीची एक चाहती एका फोटोमुळे प्रसिद्धीझोतात आली होती. आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रेक्षकांमध्ये बसलेली अशीच एक तरुणी आता प्रसिद्धी झोतात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -