एसआरपीएफ जवानांकडून अंबरनाथमधील गावाची स्वच्छता
एबीपी माझा वेब टीम | 02 Oct 2018 03:02 PM (IST)
1
ग्रामस्थ आणि जवानांनी यावेळी स्वच्छतेची शपथही घेतली.
2
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात राखीव दलाच्या पोलिसांनी स्वच्छता अभियान राबवलं.
3
अंबरनाथ तालुक्यात तळोजा रोडवर असलेलं नाऱ्हेण गाव राज्य राखीव दलाच्या बाळेगाव तुकडीने दत्तक घेतलं.
4
या तुकडीच्या वतीनं या गावात नेहमी प्रबोधनात्मक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात.
5
अभियानात राज्य राखीव दलाचे सुमारे 550 जवान सहभागी झाले होते. शिवाय नाऱ्हेण गावातले ग्रामस्थ, स्त्रिया, लहान मुलं यांचाही सहभाग मोठा होता.
6
गावातले रस्ते, शाळेचा परिसर, निवासी भाग या परिसरात स्वच्छता करून गाव स्वच्छ केलं.
7
8
गांधी जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छता अभियान सुरू आहे. यात राज्य राखीव पोलीस दलाचे जवानही सहभागी झाले आहेत.