✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

वैवाहिक आयुष्यात दोन इनिंग खेळणारे क्रिकेटर्स!

एबीपी माझा वेब टीम   |  02 Jun 2016 08:46 PM (IST)
1

विनोद कांबळीः भारताचे माजी खेळाडू विनोद कांबळी यांनी वैवाहिक आयुष्यात दोन इनिंग खेळल्या आहेत. कांबळी यांनी 1998 साली नॉएला लुईस या हॉटेल रिसेप्शनिस्ट सोबत पहिला विवाह केला होता. मात्र दोघांचे संबंध बिघडल्याने कांबळी यांनी घटस्फोट घेतला. कांबळी यांनी नंतर एंड्रिया हॅविट नावाच्या तरुणीशी दुसरा विवाह केला.

2

दिनेश कार्तिकः भारतीय संघाचा विकेटकिपर खेळाडू दिनेश कार्तिक आपल्या खेळापेक्षा वैवाहिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत राहिला आहे. दिनेश कार्तिकच्या पहिल्या पत्नीचे नाव निकिता आहे. दोघे 2007 साली विवाहबद्ध झाले होते. मात्र 2012 साली त्यांनी घटस्फोट घेतला. भारताचा खेळाडू मुरली विजय हा दिनेश कार्तिकच्या घटस्फोटाचं कारण ठरला होता. मुरली विजय आणि निकिता यांच्यामध्ये जवळीक चांगलीच वाढली होती. हे प्रकरण एवढे वाढले की दिनेश कार्तिकने निकिताशी घटस्फोट घेतला. त्यानंतर दिनेश कार्तिकने 2015 साली अॅथलेटिक दिपिका पल्लीकलशी दुसरं लग्न केलं.

3

शोएब मलिकः पाकिस्तानचा खेळाडू शोएब मलिक याने भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाशी लग्न केलं आहे. मात्र दोघांच्या लग्नापूर्वी आयशा सिद्दीकी नावाच्या तरुणीने स्वतःला शोएबची पत्नी असल्याचं सांगितलं. त्यानंतर शोएबचं हे दुसरं लग्न असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं.

4

मोहम्मद अझरुद्दीनः भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांची लव्ह लाईफ चांगलीच चर्चेत राहिली आहे. अझरुद्दीन यांनी दोन लग्न केले आहेत. अझरुद्दीनने पहिली पत्नी नौरिन हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री संगिता बिजलानीशी दुसरा विवाह केला.

5

इम्रान खानः सध्या राजकारणात सक्रिय असलेले पाकिस्तानचे माजी खेळाडू इम्रान खान यांनी दोन लग्न केले आहेत. इम्रान खान यांनी जानेवारी 2015 मध्ये पत्रकार रेहम हिच्यासोबत आपलं दुसरं लग्न केलं. इम्रान खान यांनी पहिला विवाह इंग्लंडच्या जेमिमा हिच्याशी केला होता. जेमिमाने लग्नानंतर मुस्लीम धर्म स्वीकारला होता, पण काही दिवसांनी घटस्फोट घेतला.

6

क्रिकेटच्या मैदानावर चौकार षट्कार ठोकणारे खेळाडू वैवाहिक आयुष्यात जेव्हा आऊट झाले, तेव्हा त्यांनी दुसरी इनिंग सुरु केली. अनेक क्रिकेटपटू आपल्या खेळापेक्षा वैवाहिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत राहिले आहेत.

7

वसिम अक्रमः पाकिस्तानचे माजी गोलंदाज वसिम अक्रम यांनी हुमा नावाच्या तरुणीशी पहिला विवाह केला होता. मात्र हुमा यांचं आजाराने निधन झाल्यामुळे वसिम अक्रम यांनी शानियारा थॉम्प्सन हिच्याशी दुसरा विवाह केला.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • वैवाहिक आयुष्यात दोन इनिंग खेळणारे क्रिकेटर्स!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.