शहीद नितीन कोळींच्या अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी
नितीन कोळींच्या अंत्यदर्शनासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली आहे.
शुक्रवारी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात नितीन कोळी शहीद झाले.
दरम्यान काल सकाळी नितीन कोळी यांना भारतीय लष्कराच्या जवानांनी सलामी दिली. त्यांचं पार्थिव दर्शनासाठी श्रीनगर येथील लष्करी तळावर ठेवण्यात आलं होतं.
नितीन कोळी यांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी संपूर्ण दुधगाव तयारीला लागलं आहे.
यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी नितीन कोळी यांना श्रद्धांजली वाहिली. आज नितीन कोळी यांच्यावर त्यांच्या मूळगावी म्हणजे सांगलीतल्या दुधगावात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
सांगलीः कुपवाड्यात पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले नितीन कोळी यांचं पार्थिव सांगलीतील त्यांचं मूळगाव दूधगाव येथे दाखल करण्यात आलं. त्यापूर्वी कोळी यांचं पार्थिव विमानाने श्रीनगरहून पुणे विमानतळावर आणण्यात आलं.