Coronavirus | कोरोनामुळे 'या' सेलिब्रिटींनी गमावला जीव
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हैदोस घातला आहे. जगभरात सात लाखांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. तर 37 हजार पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये अनेक दिग्गजांचाही समावेश आहे. कोरोनाने अनेक सेलिब्रिटींनाही आपल्या विळख्यात अडकवलं आहे. अनेकांना तर कोरोनामुळे आपला जीवही गमवावा लागला आहे. या सर्व सेलिब्रिटटींचा मृत्यू कोरोनामुळे झाला असला तरिदेखील यांच्यामध्ये एका गोष्टीत साम्य दिसून आलं ते म्हणजे, या सर्वांचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे.
प्रसिद्ध प्लेरायटर टेरेंस मेक्नॅले यांचा 81व्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.
म्युझिक सिंगर जो डिफी यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 61 वर्षीय डिफी यांना ग्रॅमी अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होतं.
वर्ल्ड डान्स म्युझिकमधील जॅज म्युजिशिअन मनु डिबांगो यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते 86 वर्षांचे होते.
टॉप शेफ मास्टर्स सीजन-3 चा विजेता शेफ फ्लॉयड कार्डोज यांची कोरोनाची तपासणी पॉझिटीव्ह आली होती. ज्यानंतर अनेक दिवस ते हॉस्पिटलमध्ये दाखल होते. 25 मार्च रोजी कार्डोजचं निधन झालं असून ते 59 वर्षांचे होते.
इटलीमध्ये राहणारी प्रसिद्ध अभिनेत्री लुसिया बोसमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षण दिसून आली होती. ज्यानंतर तिची तपासणी करण्यात आली होती. तपासणीमध्ये तिला कोरोना असल्याचं स्पष्ट झालं होतं. तिच्यावर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु, 23 मार्च रोजी तिचं निधन झालं. लुसिया 89 वर्षांची होती. मायकल एंजेलो एंटोनियोनी ची लव्ह स्टोरी ऑफ लव्ह अफेयर मध्ये लुसिया दिसून आली होती