Coronavirus | शाहीन बाग आंदोलनावर पोलिसांची कारवाई
देशभरातून नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला प्रचंड विरोध करण्यात आला होता. देशभरातील या कायद्याविरोधातील अनेक आंदोलनांचं शाहीनबाग केंद्र बनलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोदी सरकारने याचवर्षी नागरिकत्व दुरूस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मांडलं होतं. दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं होतं. राष्ट्रपतींच्या सहिनंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं होतं.
आंदोलनकर्त्यांना हटवल्यानंतर शाहीन बाग परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आहे.
शाहीन बाग व्यतिरिक्त दिल्ली पोलिसांनी जामिया, सीलमपूर, जाफराबाद, तुर्कमान गेट, मालवीय नगर, हौज रानी येथूनही आंदोलकांना हटवलं आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे सुरू असलेल्या आंदोलनावर अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईला काही आंदोलकांनी विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे.
अखेर आज आंदोलनाच्या 101व्या दिवशी सकाळी दिल्ली पोलिसांनी शाहीनबाग येथे कारवाई करत आंदोलकांना घटनास्थळावरून हटवले. तसेच आंदोलनस्थळी असलेले तंबूही काढले.
दिल्लीमध्ये एकूण आठ ठिकाणांवरील आंदोलकांना हटवण्यात आलं आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे 15 डिसेंबरपासून आंदोलन सुरू होते. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शाहीनबाग येथील आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलीस आणि प्रशासनाने केली होती. मात्र सर्व विरोध झुगारुन देत येथील महिलांनी हे आंदोलन सुरू ठेवले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -