Coronavirus | कोरोनाग्रस्तांसाठी बॉलिवुडकर सरसावले; कोणाची कोट्यवधींची तर कोणाची लाखोंची मदत
बॉलिवूड दिग्दर्शक डेविड धवनचा मुलगा अभिनेता वरूण धवनने आणीबाणीच्या परिस्थितीसाठी मदत म्हणून 30 लाख रूपये पीएम फंडसाठी दिले आहेत. (Photo- Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूडसोबतच राजकारणातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सनी देओलनेही कोरोनाग्रस्तांसाठी 50 लाख रूपयांची मदत करण्याचं जाहीर केलं आहे. (Photo- Instagram)
ऋतिक रोशनने देशातील गंभीर परिस्थिती पाहून मदत म्हणून 20 लाख रूपये भारत सरकारला देण्याचा निर्णय घेतला आहे. (Photo- Instagram)
गायक कुमार सानूने मदत म्हणून 5 लाख रूपये देणार असल्याची माहिती आपल्या ट्विटर हॅन्डलवरून दिली आहे. (Photo- Instagram)
कॉमेडियन कपिल शर्माही मदत करण्यासाठी पुढे आला असून त्याने 50 लाख रूपये पीएम फंडमध्ये देण्याची घोषणा केली आहे. (Photo- Instagram)
अभिनेत्री हेमा मालिनी यादेखील मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. त्यांनी 1 कोटी रूपये मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. (Photo- Instagram)
गायक गुरू रंधावाने देशावरील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून मदत म्हणून 20 लाख रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. (Photo- Instagram)
देश कोरोना व्हायरसच्या सावटाखाली आहे. कोरोनासाठीच्या उपाययोजनांसाठी प्रशासनाने मदत करण्याचं आवाहन केलं होतं. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाची दखल घेत अनेक बॉलिवूड कलाकार मदतीसाठी सरसावले आहेत. अभिनेता अक्षय कुमारने कोरोनाग्रस्तांसाठी 25 कोटींची मदत जाहीर केली आहे. त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. (Photo-Instagram @akshaykumar)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -