3 मेनंतर लॉकडाऊनचं काय होणार? लोकांनाही उत्सुकता; ट्विटरवर #WhatAfterMay3चा ट्रेन्ड
अशातच आता देशातील लॉकडाऊनबाबत केंद्र सरकार काय भूमिका घेणार, यावरून चर्चांना उधाण आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्वाधिक कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा महाराष्ट्रात आहे.
देशात कोरोना व्हायरसच्या रूग्णांमध्ये सतत वाढ होत आहे.
पहिल्या टप्प्यात पंतप्रधानांनी 21 दिवसांसाठी आणि दुसऱ्या टप्प्यात 14 एप्रिलपासून 3 मेपर्यंत 19 दिवसांसाठी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती.
कोरोना व्हायरस पसरण्यापासून रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशात 25 मार्च रोजी 21 दिवसांसाठी लॉकडाऊन लागू केला होता. त्यानंतर तो लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला.
देशातील लॉकडाऊन टप्प्याटप्याने उठवण्यासंदर्भात अनेक उपायांवर केंद्र सरकार विचार करत आहे.
देशातील अनेक राज्यांना लॉकडाऊन तीन मेनंतरही सुरू ठेवण्याची इच्छा आहे.
केंद्र आणि राज्य सरकार आर्थिक उलाढालींसाठी अनेक उपाय करत असून काही ठिकाणी लॉकडाऊनही शिथील करण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताची स्थिती इतर देशांच्या तुलनेत उत्तम आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीनी सांगितलं की, देशाला लॉकडाऊनचा फायदा झाला आहे.
कॅबिनेटच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
29 एप्रिल म्हणजेच, उद्या लॉकडाऊनबाबत कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा होणार आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात जारी करण्यात आलेला लॉकडाऊन 3 मे रोजी संपणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -