Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | कोरोनाशी लढणाऱ्या देशासाठी क्रिकेटर्सचा मदतीचा हात
क्रिकेटर गौतम गंभीरनेदेखील पीएम केअर फंडसाठी 1 कोटी रूपये मदत केली आहे. (Photo credit - Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने ट्वीट करून सांगितलं की, त्याने आणि पत्नी अनुष्काने आपला हिस्सा पीएम केअर फंडसाठी दिला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, विराट-अनुष्काने 3 कोटी रूपये पीएम केअर फंडसाठी दिले आहेत. (Photo credit - Instagram)
अजिंक रहाणेने 10 लाख रूपये पीएम फंडसाठी दिले आहेत. (Photo credit - Instagram)
पठाण ब्रदर्स म्हणजेच, यूसुफ आणि इरफान पठाणने 4000 मास्क डोनेट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी हे मास्क बडोद्यातील पोलिसांसोबतच डॉक्टरांसाठी डोनेट केले आहेत. (Photo credit - Instagram)
कॅप्टन कूल धोनीनेही एम.एस.धोनीनेही पीएम केअर फंडसाठी 1 लाख रूपये पीएम फंडसाठी दिले आहेत. (Photo credit - Instagram)
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने मदतीचा हात पुढे करत 50 लाख रूपयांची रोख रक्कम पीए केअर फंडसाठी दिली आहे. (Photo credit - Instagram)
बीसीसीआयच्या सर्व मेंबर्सने एकत्र येऊन पीएम केअर फंडमध्ये 51 कोटी रूपये डोनेट करण्यात आले आहेत. तसेच बीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी 50 लाख रूपयांचे तांदूळ गरजूंना मोफत देण्याची घोषणा केली आहे. (Photo credit - Instagram)
कोरोना व्हायरसने भारतात हैदोस घातला आहे. अशातच देशातील जनतेची मदत करण्यासाठी बॉलिवूडकरांननंतर आता क्रिकेटर्सही पुढे आले आहेत. भारतीय खेळाडू सुरेश रैनाने या पार्श्वभूमीवर पीएम फंड केअरसाठी 52 लाख रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. (Photo credit - Instagram)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -