Lockdown | खिशात पैसे नाहीत, खाण्यासाठी अन्न नाही तरीही मजुरांचं स्थलांतर सुरुच
आपल्या घरी पोहोचण्यासाठी मजूरांनी शक्य तसा प्रवास सुरु केला असला तरीही त्यांच्यासमोर खाण्याचा प्रश्न मोठा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही मजुर आपल्या घरी पोहोचण्यासाठी सायकलवरून प्रवास करत आहेत.
प्रवासी मजुरांनी घरी परत घेऊन जाण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे.
देशांतील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी सरकारने विशेष ट्रेन सुरु केल्या आहेत.
घराच्या ओढीमुळे मजुरांनी पायी प्रवास सुरु केला आहे.
मजुरांनी सांगितल्यानुसार, लॉकडाऊनमुळे कामधंदा बंद असल्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मजूरांनी स्थलांतर करण्याचा मार्ग स्विकारला आहे.
देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रकोप सुरुच आहे. अशातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊन दरम्यान, देशातील अनेक मजूर वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकले आहेत. अशातच आपापल्या घरी जाण्यासाठी या मजूरांची पायपीट सुरु आहे. लॉकडाऊनमुळे कामधंदा बंद असल्यामुळे हातावरचं पोट असणाऱ्या मजुरांचे खाण्या-पिण्याचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत अनेकांनी आपल्या घरीच वाट धरली आहे. तर काही जणांनी सायकलवर प्रवास सुरु केला आहे. अनेक मजूरांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, आमच्या खाण्या-पिण्याचे खूप हाल होत आहेत, कामधंदा बंद असल्यामुळे खिशात पैसे नाहीत. त्यामुळे स्थलांतर करण्याव्यतिरिक्त आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -