औरंगाबादमध्ये दोन गट भिडले, घरं आणि दुकांनांचं नुकसान
औरंगाबाद शहरातील मोतीकारंजा परिसरात अनधिकृत नळ तोडण्यावरुन दोन गटात वाद झाला आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत जाळपोळ केली. या वादात दुकानांबाहेरील कूलर, गाड्यांची तोडफोडही करण्यात आली.
दोन गटाने केलेल्या दगडफेकीत सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलीस जखमी झाले. यातील कोळेकर आणि परोपकारी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतर पोलिसांना घाटीत दाखल केले.
औरंगाबादमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात असून, तणावपूर्ण शांतता आहे. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका.
औरंगाबादमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात असून, तणावपूर्ण शांतता आहे. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका.
औरंगाबादमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात असून, तणावपूर्ण शांतता आहे. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका.
पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या. सहाय्यक पोलीस आयुक्तांसह दहा पोलीस जखमी झाले आहेत.
एका गटाने मोतीकारंजा रोडवरील दिसेल त्या दुकानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात दुकानांबाहेर असणाऱ्या कूलर, सामानासह गाड्यांची तोडफोड, जाळपोळ सुरु केली. हे पाहून दुसरा गटही रस्त्यावर उतरला. दोन्ही बाजूकडील सात ते आठ हजारांचा जमाव रस्त्यावर उतरला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस तयारीनिशी घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांच्या वाहनावरच दगडफेक करण्यात आली.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोतीकारंजा परिसरात अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहिम गुरुवारपासून सुरु केली आहे. पहिल्या दिवशी या भागातील एका धार्मिकस्थळाचे नळ कनेक्शन तोडण्यात आले होते. तेव्हा एका गटाने दुसऱ्या एका धार्मिकस्थळाचे नळ कनेक्शन तोडण्याची मागणी केली. यावरुन मनपाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन काल तोडले. याच कारणावरुन दोन गट शुक्रवारी सायंकाळी भिडले.
परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याची माहिती आहे. तरी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे कसोशीनं प्रयत्न सुरु आहेत. काल संध्याकाळपासून मोतीकारंजा परिसरात वाद सुरु असल्यानं तणावाची स्थिती आहे.
राजा बाजार भागात जवळपास 25 दुकाने जाळण्यात आली आहेत. या घटनेत आतापर्यंत 30 ते 40 जण जखमी झाले आहेत.