टीम इंडियाची विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक, सचिन-सेहवाग-विराटकडून शुभेच्छा!
भारतीय महिला संघ 12 वर्षानंतर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचली असून देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. टीम इंडियाच्या या विजयाची शिल्पकार ठरलेली त हरमनप्रीत कौर ठरली. तिनं 171 धावांची अप्रतिम खेळी साकारली. क्रिकेटमधील दिग्गजांनी देखील हरमनप्रीत कौर आणि टीमचं मनापासून कौतुक केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुवराज सिंह: क्रिकेटच्या कोणत्याही फॉर्मेटमध्ये अशी खेळी नेहमीच पाहायला मिळत नाही. 115 चेंडूत 171 धावांची शानदार खेळी
युसूफ पठाण: भारतीय संघासाठी शानदार विजय, अप्रतिम खेळी हरमनप्रीत… आता विश्वचषक जिंकाच!
व्हीव्हीएस लक्ष्मण: अभिनंदन टीम इंडिया… शानदार टीम एफर्ट… फायनलसाठी शुभेच्छा!
विराट कोहली : हरमनप्रीत शानदार खेळी आणि गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी
सचिन तेंडुलकर: वुमेन इम ब्ल्यूचा शानदार विजय, हा फोटोच सारं काही सांगतोय. लॉर्ड्सला येतोय आम्ही. अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाला शुभेच्छा
रवी शास्त्री: हरमनप्रीत तू रॉक स्टार आहे… खूप भारी
सुरेश रैना : महिला संघाचे अभिनंदन… फायनलसाठी शुभेच्छा
अनिल कुंबळे: कालची कामगिरी शानदार होती. अभिनंदन मिताली राज, फायनलसाठी शुभेच्छा
कपिल देव: महिला संघाची कामगिरी पाहून मला गर्व वाटतो. हरमनप्रीतची शानदार खेळी.
मोहम्मद कैफ: विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची वाट पाहतोय. फक्त एक मॅच… तुमचा अभिमान वाटतो.
इशांत शर्मा: या शानदार विजयासाठी खूप-खूप शुभेच्छा… हरमनप्रीतची शानदार खेळी
गौतम गंभीर: सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची शानदार कामगिरी, विश्वचषक विजयाच्या फारच नजीक. gambhir
शिखर धवन: महिला संघाची शानदार कामगिरी, विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी, फायनलसाठी शुभेच्छा
अंजुम चोप्रा: या शानदार खेळीसाठी खूप-खूप धन्यवाद हरमनप्रीत
वीरेंद्र सेहवाग : महिला संघाचे अभिनंदन… भारतीय संघाचा गर्व वाटतो. फायनलसाठी शुभेच्छा
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -