ठाकरे कुटुंबाकडून शिवरायांच्या जन्मस्थळाचं आणि एकविरा देवीचं दर्शन
उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी शिवनेरी गडावर जाऊन राजमाता जिजाऊ यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
वनिर्वाचित आमदार आणि ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेलेला सदस्य म्हणजेच आदित्य ठाकरे देखील एकविरा देवीच्या चरणी लीन झाले.
मिसेस मुख्यमंत्री अर्थात रश्मी ठाकरे यांनी एकविरा देवीची ओटी भरुन आशीर्वाद घेतले.
एकविरा देवी ही ठाकरे कुटुंबाची कुलदेवता आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब एकविरा देवीचं दर्शन घेतलं.
सत्तास्थापनेच्या घडामोडींदरम्यान, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर मी स्वत: शिवनेरीवर जाणार, तसंच, कुलदैवत एकवीरेचेही दर्शन घेईन, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानुसार ते हा दौरा करत आहेत.
एकविरा देवीच्या दर्शनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किल्ले शिवनेरीवर पोहोचले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेतलं.
सत्तास्थापनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच कार्ल्याच्या एकविरा देवीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेसुद्धा उपस्थित होते. (सर्व फोटो राजेश वराडकर)
शिवनेरी किल्ल्यावर पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह शिवरायांच्या पाळण्याचं दर्शन घेतलं.