मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे: मुख्यमंत्री
यावेळी त्यांनी मराठा मोर्चाच्या आयोजकांना बिझत गोंधड ठेवू नका असे आवाहन करतानाच, राज्य सरकार मराठा समाजासोबत आहे. त्यासाठी निर्णयाक निर्णय घेण्याची सरकारची तयारी आहे. या निर्णयासाठी आम्हाला चर्चा करायची आहे. कारण थेट निर्णय जाहीर करता येत नाही. त्यामुळे आपल्याला एकत्र येऊन चर्चा करावी लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीवरुनही वक्तव्य करुन अनेकांना धक्का दिला, ''किती दिवस मुख्यमंत्री राहिन याची मला परवा नाही. पण जेवढे दिवस राहीन परिवर्तनासाठी काम करेन,'' असेही ते यावेळी म्हणाले.
तसेच कोपर्डी बलात्कारप्रकरणातील आरोपींना फाशी व्हायला पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. यासाठी हे प्रकरण उज्वल निकम यांच्याकडे दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शासकीय महाविद्यालयात कॉलेजमध्ये कमी जागा आहेत. मात्र, दुसरीकडे धनदांडग्याच्या महविद्यालायात शिकणाऱ्या मराठा समाजातील मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी राज्य सरकार योजना तयार करणार, असल्याचंही त्यांनी यावेळी म्हणाले. तसेच मराठा समाजाच्या 5 लाख तरूणांना स्किल ठेव्हलपमेन्ट केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
ते पुढे म्हणाले की, ''सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात मोर्चे निघत आहेत. स्वंतत्र्य भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचे मोर्चे निघाले आहेत. या मोर्चांचे स्वरुप मुक असले, तरी त्याचा आवाज मोठा आहे. याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे.''
नवी मुंबई: मराठा समाजाला आरक्षण आणि न्याय मिळवून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी स्वत:चे बलिदान दिले. राज्यातील मराठा समाजाचा मोठा भाग आज पाठीमागे राहिला. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असं आमच्या सरकारचे स्पष्ट मत असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -