विधानभवनाबाहेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बाजारहाट
एबीपी माझा वेब टीम | 14 Aug 2016 01:29 PM (IST)
1
महत्त्वाचं म्हणजे या आठवडी बाजारामुळे शेतकऱ्यांच्या हाती थेट मोबदला मिळणार आहे. तसंच व्यापारी आणि तत्सम साखळीमध्ये नसल्यानं ग्राहक आणि शेतकरी दोघांना याचा फायदा होणार आहे.
2
शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट खुल्या बाजारात विकता यावा, यासाठी ही संकल्पना पुढे आली आहे.
3
मुंबईत विधानभवनाच्या बाहेर शेतकरी आठवडी बाजाराचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
4
उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी या शेतकरी आठवडी बाजारातून कारले, भोपळा आणि टोमॅटोचीही खरेदी केली.
5
पुढच्या काळात ज्या-ज्या ठिकाणी सरकारच्या जागा उपलब्ध आहेत, त्या-त्या ठिकाणी सरकार शेतकरी आठवडी बाजारासाठी जागा देईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
6
मुंबईत दर रविवारी हा बाजार भरवला जाणार आहे.
7