मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी समोसे खाण्यासाठी थांबतात तेव्हा...
या ठिकाणी राजकीय संघर्षाच्या जुन्या आठवणीत रमून भाजप नेत्यांनी सामोसे आणि पकोड्यांसह चहाचा आस्वाद घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी चहापानासह पकोड्याचा आस्वाद नेत्यांनी लुटला.
यावेळी अध्यक्षस्थानी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी होते तर प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खासदार कृपाल तुमाने, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, सुधाकर कोहळे, प्रा. अनिल सोले, समीर मेघे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, नागपूर ‘आयआयएम’च्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष सी. पी. गुरुनानी उपस्थित होते.
नागपुरातील मिहान येथे ‘आयआयएम’ नागपूरच्या नवीन कॅम्पसचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
शहरातील सर्व भाजप आमदार आणि महापालिकेतील भाजपचे सर्व पदाधिकारी यांच्यासह तेलंगखेडी परिसरातील समोसेवाला या दुकानात पोहोचले.
रात्री फुटाळा तलावाजवळ अखेरचे भूमिपूजन कार्यक्रम आटोपून दोन्ही नेते, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह एका समोस्याच्या दुकानी पोहोचले.
काल दिवसभर अनेक कार्यक्रम घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात अनेक भूमिपूजन आणि लोकार्पण केले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -