जीव मुठीत घेऊन ही मुलं शाळेत जातात!
शाळेत जाण्यासाठी डोंगर पार करावाच लागतो. त्यासाठी दुसरा कोणताही पर्याय त्यांच्याकडे नाही. या फोटोंमुळे तिथलं सरकार खडबडून जागं झालं आहे. पण याप्रकरणी त्यांनी काय पावलं उचलली आहेत. याविषयी अद्याप कोणतीही बातमी समोर आलेली नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया गावातील मुलांची इच्छाशक्ती आणि त्यांचं धैर्य पाहून इथलं सरकारही अचंबित झालं आहे.
डोंगर चढून गेल्यानंतरही या मुलांना शाळेत पोहचण्यासाठी बरीच पायपीट करावी लागते.
ही मुलं अक्षरश: जीव मुठीत घेऊन शाळेत जातात. कारण की, डोंगर चढता उतरताना जराशीही चूक महागात पडू शकते.
या गावातील 15 मुलं रोज 800 मी. उंच डोंगर चढ-उतार करतात.
हे फोटो पश्चिम चीनमधील अटुलर गावातील आहे.
या फोटोमध्ये 800 मी. उंचीवर जाऊन ही मुलं शिक्षण घेतात. हे फोटो चैन जी या फोटोग्राफरनं काढले आहेत.
बीजिंगच्या 'द गार्डियन'मध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार 800 मी. उंच चढून ही मुलं चक्क शाळेत जातात. शाळेत जाण्यासाठी या मुलांना ही सारी कसरत करावी लागते.
चीनच्या एका प्रसिद्ध वृत्तपत्रानं हा फोटो छापून तेथील सत्य उजेडात आणलं आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत.
पाठीवर बॅग घेऊन ही मुलं कुठल्याही अॅडव्हेंचर टूरवर चाललेली नाही. पाहा ही मुलं नेमकी जातायत कुठं....
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -