नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात 'गळाभेट' कार्यक्रमाचं आयोजन
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिक्षा पूर्ण केल्यानंतर पुन्हा गुन्ह्यांकडे वळण्याऐवजी कुटुंबाकडे परतण्याची प्रेरणा कैद्यांच्या मनामध्ये निर्माण होण्यास मदत होईल. या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, असं जेल प्रशासनानं सांगितलं.
बालदिनी अशी बाप-मुलांची भेट करून दिल्याने सर्वच बालकांनी तुरुंग प्रशासनाचे आभार मानले.
संपूर्ण विदर्भातून शेकडो बालक तुरुंगात असलेल्या आपल्या वडिलांना भेटण्यासाठी मध्यवर्ती कारागृहात पोहोचले होते.
काही वेळ कारागृहातील वातावरणही भावूक झालं होतं.
यावेळी शिक्षा भोगणाऱ्या अनेक कैद्यांना आपल्या चिमुकल्यांना पाहून अश्रू अनावर झाले.
पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातही अनोख्या पद्धतीने बालदिनाचा सोहळा साजरा करण्यात आला.
या उपक्रमात 16 वर्षांपर्यंतच्या बालकांना आपल्या वडिलांना भेटण्याची संधी देण्यात आली होती.
बालदिनानिमित्तची कारागृहात शिक्षा भोगणारे बाप आणि बापाविना जगणारी त्यांची मुलं यांची आगळीवेगळी गळाभेट झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -