...आणि भुजबळांच्या गळ्यात मफलर झळकला!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछगन भुजबळ हे तुरुंगात असताना त्यांना स्वादुपिंडाचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात त्यांना जामीन मिळाला, तरी ते रुग्णालयातच होते. कारण त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर भुजबळांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून निघाल्यावर छगन भुजबळ सांताक्रुझमधून त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले.
घरी परतल्यानंतर छगन भुजबळ यांनी गळ्यात नवा कोरा मफलर घातला.
मफलर ही भुजबळांची ओळख बनली होती. भुजबळांकडे असंख्य मफलर आहेत. घरी आल्यानंतर भुजबळांनी गळ्यात मफलर घालून भेटीगाठी सुरु केल्या.
भुजबळांना डिस्चार्च मिळाल्यावर त्यांनी माध्यमांशी बातचित केली. ते म्हणाले “स्वादुपिंडाच्या त्रासावर उपचार सुरु आहेत. काही दिवस कुटुंबीयांसोबत राहणार आहे. आराम करेन. अजून पूर्ण बरा झालो नाही.”. तसेच, पहिल्यासारख्ये सक्रीय राहता येणार नाही, अशी अट डॉक्टरांनी घातल्याचेही भुजबळांनी सांगितले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -