99 ते 888 रुपयांपर्यंतचे स्मार्टफोन
जयपुरच्या Docoss या कंपनीने Docoss X1 हा फोन लाँच केला आहे. Docoss X1 मध्ये 4 इंचचा डिस्प्ले आणि 1.2 GHz प्रोसेसर आहे. तर 1 GB रॅमसह 4GB इंटर्नल मेमरी दिलेली आहे, जी 32 GB पर्यंत वाढवली जाऊ शकते. या फोनमध्ये 2 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा तर 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. मात्र या फोनच्या विक्रीबाबत कंपनीने अद्याप कसलीही माहिती जाहीर केलेली नाही. याची किंमत 888 रुपये आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअच्छे दिनः बंगलोरच्या नमोटेल या कंपनीने देशातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आणण्याचं जाहीर केलं आहे. अच्छे दिन या स्मार्टफोनची किंमत केवळ 99 रुपये असणार आहे. या फोनमध्ये 480x800 रिझोल्युशन असणारा 4 इंचचा डिस्प्ले, 5.1 OS लॉलीपॉप आणि 1 GB रॅम असे फिचर्स असणार आहेत. याशिवाय या फोनमध्ये 4 जीबीची इंटर्नल मेमरी असेल जी 32 GB पर्यंत वाढवता येईल. 2 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा असणार आहे तर VGA सेल्फी कॅमेरा असणार आहे.
रिंगिग बेल या कंपनीने फ्रीडम 251 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची किंमत केवळ 251 रुपये आहे. मात्र या फोनची विक्री सध्या रोखण्यात आली आहे. या फोनवर काही आक्षेप घेण्यात आले आहेत.
स्मार्टफोनची वाढती मागणी पाहता ग्राहकांना स्वस्त स्मार्टफोन देण्यासाठी कंपन्यांची सुद्धा चढाओढ सुरु आहे. या वर्षात 99 रुपये ते 1500 रुपयांपर्यंतचे स्मार्टफोन लाँच करण्यात आले. काही स्मार्टफोनची घोषणा झाली तर काही बाजारात येण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -