चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यातून पृथ्वीचे नयनरम्य फोटो!
चांद्रयान-2 मोहिम पूर्णपणे यशस्वी ठरली तर चंद्रावर यान पाठवणारा भारत जगातील चौथा देश ठरेल. याआधी रशिया, अमेरिका आणि चीनने चंद्र मोहीम यशस्वी केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचांद्रयान-2 सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. या मोहिमेत चंद्रावरील अनेक गुपितं उलगडणार आहेत.
चांद्रयान-2 चे मुख्य तीन भाग आहेत, ज्यामध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर यांचा समावेश आहे.
पृथ्वीचे हे फोटो एलआय-4 या कॅमेऱ्यातून 3 ऑगस्टला घेण्यात आले आहेत. चांद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण पृष्टभागावर उतरणार आहे.
इस्रोचं चांद्रयान-2 चं यशस्वी प्रक्षेपण झालं आणि भारतानं इतिहास रचला. सध्या चांद्रयान-2 चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. चांद्रयान-2 ने कॅमेऱ्यात पृथ्वीची काही नयनरम्य फोटो टिपले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -