Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
मुख्यमंत्र्याच्या एक वर्षाच्या नातवाची संपत्ती...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहेरिटेज फूडसची प्रबंध संचालिका आणि नायडूंची पत्नी भुवनेश्वरी नायडू यांच्याकडे 38.66 कोटींची संपत्ती आहे. तर त्यांचे एकूण 13 कोटींचे देय आहे. हेरिटेज फूडसमध्ये भुवनेश्वरी यांच्या शेअर्सची किंमत 19.95 कोटी रुपये आहे. त्यांनी इतर कंपन्यांमध्ये 3.23 कोटींची गुंतवणूकही केली आहे.
तेलगु देसम पक्षाच्या प्रमुखाकडे 1.52 लाख रुपयांची अम्बेसिडर गाडी असून त्यांच्यावर 3.06 कोटींचे कर्जही आहे. यामुळे त्यांची एकूण संपत्ती मात्र 67 लाख आहे. गेल्या वर्षी हा आकडा 42 लाख रुपये होता.
लोकेशची पत्नी ब्राम्हणीकडे एकूण 5.38 कोटींची संपत्ती असून त्यांच्या नावावर जुबली हिल्समध्ये 3.50 कोटींचा एक अलिशान बंगला आहे. मनिकोंडा आणि माधापूरमध्ये त्यांच्या नावावर 1.40 कोटींची जमीनही आहे.
लोकेश यांचा गेल्यावर्षीच जन्मलेला मुलगा देवांशकडील संपत्तीचीही घोषणा केली आहे. देवांशच्या नावावर जुबली हिल्स परिसरात 9.17 कोटींचा बंगला, तसेच 2.4 कोटींची रोख रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवण्यात आली आहे. लोकेशच्या मते, सत्तेमध्ये असताना किंवा विरोधी पक्षात असताना संपत्ती जाहीर केले आहे.
टीडीपीचे महासचिव आणि चंद्राबाबूंचा मुलगा लोकेशकडे 14.50 कोटींची संपत्ती असून त्यांच्यावर 6.35 कोटींचे कर्ज आहे. त्यांनी हेरिटेज फूडसमध्ये 2.52 कोटी तर इतर कंपन्यांमध्ये 1.64 कोटींची गुंतवणूक केली आहे.
मुख्यमंत्र्यांचा मुलगा लोकेशने बुधवारी सलग सहाव्या वर्षी आपल्या संपत्तीची घोषणा केली. यामध्ये नायडूंची एकूण संपत्ती 3.73 कोटी रुपये असून यामध्ये हैदराबादमधील जुबली हिल्स उच्चभ्रू वस्तीतील बंगल्याचाही (किंमत 3.63 कोटी रुपये) समावेश आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या कुटुंबियांकडे एकूण 74 कोटींची संपत्ती असून त्यातील तब्बल 11.57 कोटींची संपत्ती त्यांच्या एक वर्षाच्या नातवाच्या नावावर आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -