पाकिस्तानी संघावर शुभेच्छांचा वर्षावर, कोण काय म्हणाले?
1992 मध्ये पाकिस्तानला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार इम्रान खान म्हणाले, “चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानी संघाचं अभिनंदन. फखर झमानसारखा खेळाडू पाहाणं जबरदस्त होतं.”
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम आक्रम म्हणतो, “शानदार! टीम ग्रीनचा विजय अविश्वसनीय आहे. 1992 चा वर्ल्डकप जिंकल्याची प्रचिती होत आहे. आनंद गगनात मावेनासा झालाय”
टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग म्हणतो, आजच्या जबरदस्त विजयाबद्दल पाकिस्तानचं अभिनंदन. चांगला खेळ केल्याने ते विजयाचे दावेदार होते. पाकिस्तानच्या क्रिकेटसाठी हा विजय महत्त्वाचा आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी म्हणतो, “ही कामगिरी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशातील चाहते कायमचे लक्षात ठेवतील. पाकिस्तानने ही चॅम्पियन्स ट्रॉफी संस्मरणीय केली”
श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा म्हणाला, “पाकिस्तानी संघ हिम्मत आणि विश्वासाने खेळले. त्यांनी अविश्वसनीय खेळ केला.
सरफराज अहमदच्या पाकिस्ताननं टीम इंडियाचा 180 धावांनी धुव्वा उडवून पहिल्यांदाच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. पाकिस्तानच्या या जबरदस्त विजयानंतर त्यांच्या संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -