बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरताच युवराजच्या नावावर मोठा विक्रम
सेमीफायनलमध्ये खेळण्यापूर्वीच टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराजने सिंहने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवन डे क्रिकेटमध्ये 300 सामने खेळण्याचा विक्रम युवराजने पूर्ण केला आहे. 300 सामने खेळणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.
आपला जीव वाचला, हीच मोठी गोष्ट आहे, असं युवराज सामन्यापूर्वी पीटीआयशी बातचीत करताना म्हणाला. कॅन्सरशी लढा देत युवराज पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरला.
2011 च्या विश्वचषकात युवराजला कॅन्सरचा आजार असूनही तो टीम इंडियासाठी खेळतच राहिला. संपूर्ण विश्वचषकात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत त्याने टीम इंडियाला विश्वषकाचा किताब मिळवून दिला.
युवराजने 300 सामन्यांमध्ये 36.84 च्या सरासरीने 8 हजार 622 धावा केल्या आहेत.
फायनलमध्ये भारताचा मुकाबला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.
सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली यांच्यानंतर 300 सामने खेळणारा युवराज पाचवा खेळाडू ठरला आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये बांगलादेशवर 9 विकेट्सने मात करुन टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -