मुंबई, ठाणे, पंढरपूरसह राज्यात मराठा समाजाचा चक्काजाम
मराठा समाजाला आरक्षणासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चक्काजामचं आयोजन करण्यात आलं आहे.
मुंबईतील दादर फ्लायओव्हरवर गटारचे झाकन टाकून कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. सिमेंटचं झाकण टाकून कार्यकर्त्यांनी पळ काढला
डोंबिवलीत मराठा समाजाच्यावतीने चार रस्ते जाम केल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
डोंबिवली, ठाणे, मुलुंड, मुंबई-पुणे महामार्गावर मराठा समाजाचा चक्काजाम सुरु आहे. तर कामोठ्यातील कळंबोली इथे आंदोलन सुरु आहे.
पंढरपूर-सातारा रोड बंद असून सकाळी 9 वाजल्यापासून चक्काजामला सुरुवात झाली. रस्त्यावर वाहनेच नसून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दादरमधील चित्रा सिनेमागृह, वरळी नाका, चेंबूर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा याठिकाणी चक्काजाम केला जाणार आहे. तसंच मुंबई-अहमदाबाद महामार्गांसह इतर महामार्गावर चक्काजाम करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने आज मुंबईसह राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.