'उडता पंजाब'नंतर आता गुजराती सिनेमाला सेन्सॉरनं सुचवले 100 कट
सामान्य बजेटचा हा सिनेमा 17 जूनला प्रदर्शित होणार होता. हा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनवर घाला आहे. असं मत या सिनेमाच्या दिग्दर्शकानं व्यक्त केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसेन्सॉरनं प्रत्येक सीनमधील पाटीदार अथवा पटेल शब्द हटविण्यास सांगितले आहे. तसेच पटेल आंदोलनाची आठवण देणाऱ्या कंटेटलाही हटवण्यास सांगितले आहे..
भावनाप्रधान विषय निवडल्यामुळेही सेन्सॉर सिनेनिर्मात्यांना प्रश्न विचारला आहे.
नुकताच 'उडता पंजाब' सिनेमावरुन बराच गदारोळ झाला होता. सिनेनिर्मात्यांना हायकोर्टाचा दरवाजा ठोठावावा लागला होता. मात्र, तीन सूचना आणि एक कट यासोबत उडता पंजाबला प्रदर्शनाची परवानगी देण्यात आली.
सिनेनिर्मात्याच्या मते, चित्रपटातील प्रत्येक सीनमधून पटेल शब्द हटविण्याची मागणी केली आहे. इतकंच नव्हे तर, पटेल आंदोलनाची आठवण देणारे विषयही यातून हटवावे असं सेन्सॉरनं सांगितल्याचा आरोप निर्मात्यांनी केला आहे.
या सिनेमात सेन्सॉरनं 100 कट सुचवले आहेत.
'उडता पंजाब'चा वाद सुरु असतानाच सेन्सॉर बोर्डानं आता एका गुजराती चित्रपटाला तब्बल 100 कट सुचवले आहेत. गुजराती चित्रपट 'सलगतो सवाल अनामत' याला हे कट सुचवले आहेत. या सिनेमात आरक्षणावर काही मुद्दे आहेत. पटेल लीडरला हिरो दाखविल्यानं सेन्सॉरनं हे कट सुचवले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -