एसटी-कंटेनरची धडक, कंटेनर नदीत कोसळला, बस कठड्यावर
एबीपी माझा वेब टीम | 07 Dec 2017 04:51 PM (IST)
1
बुलडाण्यात पूर्णा नदीवरील पुलावर एसटी आणि कंटेनर एकमेकांवर धडकून अपघात झाला आहे.
2
अपघातानंतर कंटेनर 20 फूट पुलावरुन खाली नदीत पडला, तर एसटी बस पुलावरुन खाली पडता-पडता वाचली आणि पुलावर तरंगली.
3
ही धडक इतकी जबरदस्त होती, की कंटेनर नदीत कोसळला, तर एसटी पुलाच्या कठड्यावर तरंगत होती.
4
बुलडाण्यातील जळगाव-जामोद ते नांदुरा रस्त्यावर असलेल्या पूर्णा नदीच्या पुलावरुन जाताना एसटी बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली.
5
10 ते 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती आहे. घटनास्थळी प्रशासन दाखल झालं असून मृतांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
6
अपघातात कंटेनर नदीत कोसळून ड्रायव्हर-क्लीनरचा मृत्यू झाला, मात्र जळगाव-बुलडाणा एसटीमधील चालक-वाहकासह 40 ते 50 प्रवासी सुदैवाने बचावले आहेत.
= 6">