घाटकोपरमधील चार मजली इमारत कोसळली, 30 ते 40 जण ढिगाऱ्याखाली
दरम्यान इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 8 ते 10 नागरिक अडकल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. मात्र 30 ते 40 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. तसंच मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने घटनास्थळी तात्काळ मदत यंत्रणा पाठवली आहे. याशिवाय 8 अॅम्ब्युलन्स घटनस्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.
सुमारे 40 वर्षांपूर्वीची ही इमारत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या नर्सिंग होमचं नुतनीकरण सुरु होतं.
घाटकोपरमधील एलबीएस रोडवर श्रेयस सिनेमाजवळ ही इमारत होती. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही इमारत जमीनदोस्त झाली.
मुंबईतील घाटकोपरमध्ये चार मजली रहिवासी इमारत कोसळली. दामोदर पार्क इथे ही घटना घडली. ढिगाऱ्याखालून नऊ जणांना सुखरुप बाहेर काढलं असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.